शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेला महापौर पदच हवे, काँग्रेस-भाजपापुढे सत्तेचा कठीण पेच, पक्षातंर्गत गटबाजी ठरतेय डोकेदुखी

By राजेश भोजेकर | Updated: February 8, 2026 16:20 IST

मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडीपेक्षाही जास्त राजकारण चंद्रपूरमध्ये सुरू आहे. किंगमेकर ठरलेल्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना खिंडीत गाठत कोंडी केली आहे. 

- राजेश भोजेकर, चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीस अवघे दोन दिवस उरले असतानाही सत्तास्थापनेचे चित्र अद्याप धूसरच आहे. महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संख्याबळ जुळविताना मित्रपक्षांना सामावून घेण्याचे आव्हान काँग्रेस आणि भाजपसमोर उभे ठाकले आहे.

काँग्रेस पक्षातील गटबाजीवर तोडगा निघाला असला, तरी सत्तेसाठी आवश्यक असलेले ३४ चे संख्याबळ जुळवणे सोपे राहिलेले नाही. काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या प्रहार जनसेवा (भाशेकाप) व एआयएमआयएमचे गटनेते पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल केले आहे. मात्र, काँग्रेसकडून या पदासाठी देण्यात आलेले राहुल चौधरी व वसंत देशमुख हे दोन्ही उमेदवार देशमुख यांना मान्य नाहीत. विशेषतः वसंत देशमुख यांच्या नावाला त्यांनी कडवा विरोध दर्शविला आहे.

उपमहापौर काँग्रेस सोडणार का?

उपमहापौरपद काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गटाच्या वाट्याला गेल्याने राहुल चौधरी नामांकन मागे घेऊन वसंत देशमुख यांचे नामांकन कायम राहील, अशी तडजोड आहे. मात्र उमेदवार बदलण्याची शक्यता कमीच आहे. 

अशावेळी उपमहापौर पदाच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची ठाम भूमिका पप्पू देशमुख यांची आहे. अशात उद्धवसेनाही सोबत आली नाही तर काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे.

उद्धवसेना तटस्थ राहणार?

उद्धवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे यांची भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. 

काँग्रेसने स्थायी समिती सभापतिपद तर भाजपने सव्वा-सव्वा वर्षाचा प्रस्ताव उद्धवसेनेपुढे ठेवला आहे. उद्धवसेनेला आधी महापौर हवे. स्थायी समिती सभीपती पद नकोच, अशी भूमिका आहे. 

उद्धवसेनेची मागणी पूर्ण झाली नाही आणि तटस्थ राहण्याची वेळ आल्यास संख्याबळाच्या आधारावर काँग्रेससाठी सत्ता सोपी होईल, असे चित्र आहे.

गटबाजी : काँग्रेसमधील संपुष्टात, भाजपत डोके वर

काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली असतानाच भाजपमधील गटबाजीने डोके वर काढले आहे. भाजपश्रेष्ठींनी संगीता खांडेकर यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित केले असताना सविता संदूरकर यांच्या उमेदवारीने भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

आमदार किशोर जोरगेवारांकडून पर्यायी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असले तरी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मग उपमहापौरपदासाठी दोन अर्ज का नाही, असा सवाल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Mayoral Race: Shiv Sena's Demand Creates Impasse for Congress, BJP

Web Summary : Chandrapur's mayoral election faces uncertainty. Shiv Sena's insistence on the mayor post complicates Congress and BJP's efforts to secure power. Internal party conflicts further hinder coalition building and decision-making for both parties.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे