शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’

By admin | Updated: April 15, 2016 01:27 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६

स्तुत्य उपक्रम : अभियानाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठकचंद्रपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ग्राम उदय से भारत उदय अभियान राबविण्याच्या सूचना नुकत्याच शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत. जिल्ह्यात अभियानाचा प्रसार व्हावा व अभियान जिल्ह्यातील गावात यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरावर नुकतीच अभियानाच्या अनुषंगाने विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहे.सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगत करणे, पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे, आणि गरीबांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश असून अभियान कालावधी या उद्दीष्टानुसार गाव स्तरावर विविध उपक्रम राबवून योजनांची प्रचार प्रसिद्धीकरुन ग्रामीण भागात योजनाविषयी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. सामाजिक एकोपा वृद्धीगत करण्याच्या अनुषंगाने समरसता व सद्भावना शपथ व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदानाबाबत ग्रामस्थामध्ये चर्चा घडवून, या विषयाच्या माहितीचे साहित्य गावस्तरावर ग्रामस्थांना वाटप करण्यात येईल.