शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या प्रकार हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवारात जाऊन संबंधित घराचा आडोसा घेतला असता, तिथे घरातून विचित्र अशा मंत्रोच्चाराचा आवाज येत होता.

ठळक मुद्देम्हणे पैशाचा पाऊस पडणार : युवतीसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील जुनोना-कारवा मार्गावरील शेतशिवारातील एका घरात सुरू असलेल्या अघोरी तंत्र-मंत्र पूजेचा भांडाफोड करण्यात जुनोना गावातील ग्रामस्थांसह बल्लारपूर पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पाच जणांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका युवतीसह प्रशांत बन्सोड, नरसिंग अकिल्लावार यांना अटक करण्यात आली. तर नथ्थु औरासे व मांत्रिक देवा हे पसार झाले आहेत. त्यांचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहेत.शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवारात जाऊन संबंधित घराचा आडोसा घेतला असता, तिथे घरातून विचित्र अशा मंत्रोच्चाराचा आवाज येत होता. गावातील काही सतर्क नागरिकांनी जराही विलंब न करता बल्लारपूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. लागलीच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी या घरावर धाड टाकून जादूटोणा व तंत्र मंत्राच्या आधारे सुरू असलेली पूजा उधळून लावली. अत्यंत निर्जन अशा ठिकाणी ही पूजा सुरू होती. मात्र पोलिसांनी या ठिकाणी धाडसाने पोहोचत ही पूजा व पूजा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, पैशाचा पाऊस पाडण्यासाठीच्या या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, आणि मंत्र-तंत्राच्या नावाखाली ते आणखी काय काय करणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईदरम्यान जुनोना येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले.

टॅग्स :Policeपोलिस