Two-wheeler thief arrested | दुचाकी चोरट्यास अटक

दुचाकी चोरट्यास अटक

चंद्रपूर : शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या वेळी आरोपीकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. नीलेश यशवंत गरलेवार (३६, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चंद्रपूर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. गुन्हे शोध पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी नीलेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या वेळी त्याने दुर्गापूर, रामनगर पोलीस हद्दीतून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. नीलेशकडून एमएच ३४ बीक्यू २४४०, हीरो फॅशन एमएच ३४ एटी ९९०९, हीरो स्पेंडलर एमएच ३४ क्यू ९१५० या क्रमांकांच्या तीन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि बोबडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, संजय आतकुलवार, चंदू नागरे, अमजद खान, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे यांनी केली.

Web Title: Two-wheeler thief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.