चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:04 IST2019-02-25T10:04:32+5:302019-02-25T10:04:55+5:30
जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीत दोन जण जागीच ठार झाले.

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन ठार
ठळक मुद्देमूल मार्गावर झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीत दोन जण जागीच ठार झाले.
अंजनी ट्रॅव्हलची बस नागपूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेली दुचाकी बसवर जाऊन धडकली. यात प्रकाश धंदरे (३०), बाळू सिडाम (२८) हे दोघेही जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेला जंगली ससाही यात ठार झाला.