मोहबाळा गावात दोन गोठ्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:57 IST2018-04-19T23:57:21+5:302018-04-19T23:57:21+5:30

तालुक्यातील मोहबाळा गावातील दोन गोठ्यांना अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. आगीत गोठ्यातील जनावरांचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली.

Two jam fire in Mohabbale village | मोहबाळा गावात दोन गोठ्यांना आग

मोहबाळा गावात दोन गोठ्यांना आग

ठळक मुद्देअवजारेही जळाली : जनावरांचा चारा खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील मोहबाळा गावातील दोन गोठ्यांना अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. आगीत गोठ्यातील जनावरांचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली.
वरोरा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीनजिक मोहबाळा गावालगतच्या पंढरी धोंगडे व मनोहर धोंगडे यांच्या गोठ्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत दोन्ही गोठ्यातील जनावरांचा चारा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर एका झाडालाही आग लागली. आग पसरून नजीकच्या घरात येऊ लागली. परंतु जीएमआर कंपनी व वरोरा नगरपालिकेचे अग्नीशमक दल घटनास्थली दाखल झाल्याने आग नियंत्रणात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शेतातून मोटारपंप चोरला
कोठारी : बामणी शिवारात शैलेश दयाल रामटेके यांची पाच एच.पी. चा मोटारपंप चोरट्यांनी चोरून नेला. शेतातील विहिरीवर हा मोटारपंप बसविला होता. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री शेतात कुणीही नसल्याचा फायदा घेत मोटारपंप चोरुन नेला. मोटारपंपाची किंमत २५ हजार रुपये आहे. याबाबत कोठारी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Two jam fire in Mohabbale village

टॅग्स :fireआग