शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १४६ बसेस ४२ हजार कि.मी. धावल्या, हाती पडले केवळ दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST

जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारात एकूण २३५ बसेस लॉकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५०० ते ६०० ...

जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारात एकूण २३५ बसेस लॉकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५०० ते ६०० फेऱ्या होत होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. परंतु, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर निम्म्या बस धावू लागल्या. दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत होते. मात्र मागील काही दिवसांपासून ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यातच शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

बॉक्स

दोन दिवसांत ८० हजार किमीचा प्रवास रद्द

जिल्ह्यातील चारही आगारातून सुमारे ८० हजार किमीपर्यंत बसफेऱ्या धावत होत्या. त्यातून लाखों रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते. मात्र वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ २९ हजार किमी अंतर बस धावली. ४९ हजार किमी अंतराच्या बस रद्द करण्यात आल्या. त्यातून महामंडळाला सहा लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. रविवारी १३ हजार किमी बस धावल्या. ६६ हजार किमी अंतराच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला केवळ तीन लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन दिवसांत केवळ महामंडळाला नऊ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

बॉक्स

कर्मचारीही कमी

शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बहुतांश कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढा शेड्यूल होता. तेवढे कर्मचारी कामावर होते. नेहमी वाहनचालक व वाहक यांच्या दोनवेळा ड्युटी लावण्यात येत होत्या. मात्र या वीकेंड लॉकडाऊनला बसफेऱ्या कमी असल्याने एकच ड्युटी लावण्यात आली होती.

-----

बॉक्स

२३५ आगारातील एकूण बसेसची संख्या

१४६ दोन दिवसांत धावलेल्या बसेस

९९०००० पैसे मिळाले दोन दिवसांत