दोन दुचाकी परस्परांना धडकल्या : दोन ठार; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:11+5:302021-09-17T04:34:11+5:30
रामपूर-माथरा वळण देत आहे मृत्यूला आमंत्रण मृतामध्ये आठ महिन्याचा चिमुकला सास्ती : रामपूर-माथरा रोडवरील वळणावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता ...

दोन दुचाकी परस्परांना धडकल्या : दोन ठार; दोन जखमी
रामपूर-माथरा वळण देत आहे मृत्यूला आमंत्रण
मृतामध्ये आठ महिन्याचा चिमुकला
सास्ती : रामपूर-माथरा रोडवरील वळणावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या मोटारसायकल अपघातात चिन्ना महेंद्र चित्तलवार (८ महिने) व संदीप सुधाकर काटवले (२८) यांचा मृत्यू झाला तर महेंद्र चित्तलवार व अल्का चित्तलवार जखमी झाले असून जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
गुरुवारी सायंकाळी महेंद्र चित्तलवार हे आपल्या दुचाकीने पत्नी अलकासह आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला राजुऱ्याकडे दवाखान्यात येत असताना विरुद्ध दिशेने राजुराकडून साखरीकडे येणाऱ्या संदीप सुधाकर काटवले यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात महेंद्र चित्तलवार यांचा आठ महिन्यांचा मुलगा चिन्ना हा जागीच ठार झाला तर संदीप काटवले हा दवाखान्यात उपचाराकरिता नेत असताना मृत पावला. महेंद्र चित्तलवार व अल चित्तलवार हे दोघे पती-पत्नी जखमी असून यांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.