शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : धान उत्पादकांना चिमूरला जाण्याची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. परंतु बाजारामध्ये धानाचे भाव गडगडल्याने हमी भावाने धान खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ आदिवासी सेवा सहकारी सोसायटींना हमी भावाने धान खरेदी करण्याचे अधिकार दिल्याने या केंद्रावर धान विकल्यास हमी भाव व धानाकरिता शासनाने जाहीर केलेले अनुदानही धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.शेतकऱ्यांना धान विक्रीकरिता जाताना धानाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक असने गरजेचे आहे. धान खरेदी एका शेतकऱ्यांकडून प्रती हेक्टर ३५ क्विंटल तर अनुदान ५० क्विंटलपर्यंत दिले जाणार आहे. धान विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. या नविन निर्णयामुळे काही प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सोयाबीनची आवक वाढताच दर घसरलेचंद्रपूर : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सहन करीत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका सहन करावा लागतो. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. काढणीला आलेले काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले तर काही ठिकाणी पाणी लागल्याने सोयाबीनला डाग लागला. हाच डाग व्यापाऱ्यांची चांदी करणारा ठरला असून शेतकऱ्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनला सर्वसाधारण दर तीन हजार ६०० रुपये प्रती क्विंटल होता मात्र, शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्रीसाठी येताच सोयाबीनचा काळा डाग शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरला. ९० टक्के शेतकऱ्यांना कधीच उच्चांकी दर मिळाला नाही. मागील वर्षी साठवणूक करून ठेवणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांना दरवाढीचा अधिक फायदा झाला आहे. काळ्या डागाने प्रति क्विंटल किमान ८०० ते एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले. त्यात पुन्हा ओलावा आल्याने शेतकरी पुरते हतबल झाले. रबी पेरणीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मिळेल तो दर घेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले. मात्र महिना भरातच दर वाढत गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पश्चातपही झाला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड