शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

जोेडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:57 PM

आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे.

ठळक मुद्दे२० कोटींचा खर्च : शहीद कुमराम भीमू स्मृतीस्थळ

आॅनलाईन लोकमतराजुरा : आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, त्यांच्या रुढी, परंपरा जगापुढे यावे, याकरिता तेलंगणा राज्यातील आसिफाबादवरून ४० किलोमीटर अंतरावरील निसर्गाने नटलेल्या जोडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय उभारले आहे. शुरवीर कुमराम भीमू यांच्या समाधी स्थळाजवळ निर्माण करण्यात आलेली ही वास्तू आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरत आहे.या संग्रहालयामध्ये आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा, चालीरिती, सांस्कृतीक महोत्सवाची हुबेहुब निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर निजामाच्या विरोधात लढणाºया शुरवीर कुमराम भीमू यांच्या समाधी स्थळावर एक नवीन ऊर्जा प्राप्त झाल्याचा आभास होत असते. त्यामुळे हे ठिकाणी तेलंगणा सोबतच महाराष्टÑातील आदिवासी नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या कामासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.जोडनघाट येथे राजुराचे माजी आ. प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरु पा. जुमनाके, आदिवासी नेती भीमराव मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, विश्वेवर मंगाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष बाबूराव मडावी, भारीचे सरपंच सत्तरशाहा कोटनाके, माजी जि. प. अध्यक्ष संतोष कुमरे, सरपंच सोनेराव पेंदोरे, सरपंच प्रभाकर उईके, सरपंच हनमंतु कुमरे, सरपंच सिताराम मडावी, सरपंच रामनराव तोडासे, माजी सरपंच भास्कर सिडाम, नामदेव मडावी, पांडुरंग कोले, गोविंद पंधरे, भीमराव मेश्राम, प्राचार्य सुगणाकर यांच्यासह आदिवासी समाजबांधवांनी भेट दिली.जिवती तालुक्यात संग्रहालय उभाराज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने आदिवासी संस्कृती जपण्यासाठी जोडनघाट येथे मोठी वास्तू निर्माण केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने जिवती तालुक्यातील पहाडी भागात आदिवासीची संस्कृती जपणारी वास्तू निर्माण करावी, अशी मागणी माजी आ. प्रभाकर मामुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.