शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांकडून खासगी जागेवरील झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

पोलिसांत तक्रार : नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंडपिपरी : तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतीने वीजतारांना अडसर ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्याचा ...

पोलिसांत तक्रार : नुकसानभरपाई देण्याची मागणी

गोंडपिपरी : तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतीने वीजतारांना अडसर ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्याचा ठराव पारित केला होता. मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी छाटणे सोडून इतर खासगी जागेवरील जुन्या वृक्षांची कत्तल केल्याचा प्रताप समोर आला असून, यासंबंधी जागा मालकाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

ग्रामपंचायत करंजीअंतर्गत पाण्याच्या टाकीजवळील काही वृक्षांची वाढलेली फांदी पाहून वीज प्रवाहित करणाऱ्या तारांना स्पर्श होत असल्याचे निदर्शनास आले. यावरून ग्रामपंचायतीने विद्युततारांना अडसर ठरणाऱ्या वृक्षफांद्या तोडण्याबाबत ठराव पारित करून वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या. मात्र वीज वितरण कंपनीचे लाइनमन शेडमाके यांनी करंजी येथील तुकेश पत्रूजी वानोडे यांच्या सर्व्हे नंबर ९६३ मधील खासगी जागेत अंदाजे २५ ते ३० वर्षांपासून सजीव शिसम जातीच्या चार वृक्षांची बुडापासून कत्तल केली. तर एक झाड अर्धवट कापले आहे. यामुळे तुकेश वानोडे यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, त्यांनी याबाबत ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अन्यायग्रस्त वानोडे यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात ग्रामपंचायत करंजी, सहायक अभियंता वीज वितरण कार्यालय गोंडपिपरी तसेच लाइनमन व इतर दोन यांच्यावर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याबाबतची लेखी तक्रार केली. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.