लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनला रोखण्यासाठी प्रशासन अधिक सक्त झाले आहे. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना विविध अटी लावल्या आहेत. दोन्ही डोस घेतले असतील तरच आता रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. डोस घेतले नसेल तर तिकीटच मिळणार नसल्याने लसीकरण न केलेल्या प्रवाशांची मोठी गोची होणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच रेल्वेसेवा बंद करण्यात आली. त्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये आरक्षणाची अट ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वे विभागाने रेल्वे सुरू केल्या. हळहळू प्रवाशांची संख्याही वाढी लागली आहे. परंतु, कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार रेल्वेचा प्रवास करणारे प्रवासी हे दोन्ही डोस घेतलेले असतील तर त्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. याउलट डोस न घेतलेल्यांना तिकीटही न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याने अद्यापही लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्यांची मोठी गोची होणार आहे.
आधी लस मगत तिकिट
- आधी लस मगच तिकीटरेल्वेस्थानकावर तिकीट काउंटरवर तिकीट काढण्यासाठी गेल्यास आधी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याची पडताळणी केली जात आहे. - प्रमाणपत्र नसल्यास मोबाइलवर मेसेजची पडताळणी करूनच जर डोस घेतला असल्यास तिकीट देण्यात येत आहे. अन्यथा तिकीट देण्यास मनाई केली जात आहे.
ेल्वे विभागाने घेतलेला लसीकरणाबाबतचा निर्णय चांगला आहे. नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता हा निर्णय स्वागताहार्य आहे. यामुळे लसीकरणाचा कल वाढणार आहे. -रितीक तांदूळकर, प्रवासी
रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने लसीकरण सक्तीचे केले. हा निर्णय योग्यच आहे. परंतु, पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण जात आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात यावी. -सुनील खामनकर, प्रवासी