शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या बिलासाठी लाभार्थ्यांची भटकंती

By admin | Updated: April 12, 2016 03:42 IST

जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकूल मंजूर झाले. नवे घर मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी राहत्या

पाटण: जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकूल मंजूर झाले. नवे घर मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी राहत्या घराचे छत खोलले. पदरमोड करून साठवलेल्या पैशातून कामही सुरू केले, मात्र सज्जा लेव्हलपर्यंर बांधकाम पोहोचूनही पहिला हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे हे लाभार्थी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नव्या घराच्या आशेने राहते घरही तोडल्याने आता अनेकांवर कुटुंबासह गोठ्यात रहण्याची पाळी आली आहे.जिवती तालुक्यातील चिखली (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत नाईकनगर येथील लाभार्थी पीकाबाई अमृत चव्हाण यांच्या घरकुलाची अवस्था अशीच झाली आहे. त्यांना घरकूल मंजूर झाले. स्वत:च्या खर्चातून काम सुरू केले. बांधकाम सज्जापर्यंत पोहचले मात्र अद्यापही घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. जवळचा पैसाउरलेला नाही. कधी मिळाणर हे कुणी अधिकारी सांगायला तयार नाही. गावताीलच नीलकंठ गावटू जाधव या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा जोता झाला आहे. त्यांनाही पहिला हप्ता मिळालेला नाही. याच ग्रामपंचायत अंतर्गत रेंगागुडा गावातील घरकुल लाभार्थी सोनेराव मंगू सलाम यांच्या घरकुलाचा फक्त जोता झाला आहे. तरीही त्ाांंना दोन हप्ताचे ७० हजार रुपये मिळाले. मात्र ते घरकुल अपूर्ण अवस्थेत आहे. (वार्ताहर)हप्त्यासाठी द्यावी लागते चिरीमिरी४घरकुलाचे काम न होताही काही लाभार्थ्यांना दोन ते तीन हप्ते देण्यात आले आहेत, मात्र व प्रत्यक्षात घरकुलाचे काम पूर्ण झाले अशांना घरकुलाच्या हप्त्यासाठी चकरा माराव्या लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी द्यावे लागते. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाही करावी अशी प्रतिक्रिया पंचफुला सुधाकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या दोन लाभार्थ्यांचे हप्ते आम्ही २८ मार्च २०१६ ला पाटण येथील स्टेट बँकेत पाठविले आहे. -गवळी, संवर्ग विकास अधिकारी, जीवतीवरील दोन व्यक्तींचा घरकुलाचा चेक अजूनपर्यंत बँकेत आलेला नाही. -शाखा व्यवस्थापकभारतीय स्टेट बँक, पाटण