लग्नाच्या वाढदिवशी पर्यटकाचा मृत्यू; ताडोबा व्याघ्र सफारीला गेलेल्या कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 07:36 IST2023-05-03T07:36:11+5:302023-05-03T07:36:22+5:30

मुंबई येथील रहिवासी असलेले केशव बालगी आपल्या परिवारासह लग्नाच्या ४० व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी ताडोबा येथील संसारा गेस्ट हाऊस येथे आले होते.

Tourist dies on wedding anniversary; Condolences to family who went on Tadoba Tiger Safari | लग्नाच्या वाढदिवशी पर्यटकाचा मृत्यू; ताडोबा व्याघ्र सफारीला गेलेल्या कुटुंबावर शोककळा

लग्नाच्या वाढदिवशी पर्यटकाचा मृत्यू; ताडोबा व्याघ्र सफारीला गेलेल्या कुटुंबावर शोककळा

चिमूर (जि. चंद्रपूर) - लग्नाच्या ४० व्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीला आलेल्या मुंबई येथील पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास काळा आंबा परिसर कोलारा येथे घडली. केशव बालगी (७१) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. 

मुंबई येथील रहिवासी असलेले केशव बालगी आपल्या परिवारासह लग्नाच्या ४० व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी ताडोबा येथील संसारा गेस्ट हाऊस येथे आले होते. दुपारी पत्नी, मुलगा व सून यांच्यासोबत कोलारा कोअर जंगलात जात असताना अचानक केशव बालगी यांची प्रकृती खालावली. क्षणाचाही विलंब न करता त्यांना त्यांचा मुलगा, सून,  गाईड व चालकांनी मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

Web Title: Tourist dies on wedding anniversary; Condolences to family who went on Tadoba Tiger Safari