शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:24 IST

Chandrapur : गावखेड्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क वासेरा : शासनाने ग्रामीण भागात 'स्वच्छ भारत मिशन' राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून शौचालय बांधून दिले. मात्र, आजही घरात शौचालय असताना सिंदेवाही तालुक्यातील गावखेड्यांत महिला, पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तर शौचालयात काड्या, गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली. या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करत आवश्यक सूचना केल्या. त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले. पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.

गुड मार्निंग पथके गेली कुठे?■ सद्यस्थितीत कोणत्याही गावात हागणदारीमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात कुणीही अमलात आणताना दिसत नाही. तसेच कुठेही गुड मॉर्निंग पथक कार्यरत असल्याचे जाणवत नाही. त्यामुळेच की काय सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिव- सागणिक वाढत आहे.■ एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे स्वच्छता अभियानाचे व हाग- णदारीमुक्तीचे तीनतेरा वाजले आहेत. तेव्हा ग्रामीण भागात खरंच हागण- दारीमुक्ती करायची असेल, तर प्रशासनाला जोमाने आणि निरंतर काम करावे लागेल. जेणेकरून गावखेड्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानchandrapur-acचंद्रपूर