शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलानेच रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव 

By परिमल डोहणे | Updated: September 28, 2022 20:00 IST

शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा डाव रचला. 

चंद्रपूर : शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता. वडिलाने मोबाइल हिसकावून शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, त्याला शाळेत जायचेच नव्हते. त्यामुळे त्याने थेट स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपण कसे सुटलो, अशी माहिती त्याने कुटुंबीयासह पोलिसांना दिली. अचानक घडलेल्या या घटनेने सारेच अचंबित झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा बिंग फुटले. चित्रपटात शोभावा असा प्रकार बुधवारी चंद्रपुरात शहर पोलिसांनी उघडकीस आणला.

चंद्रपूर येथील एका १३ वर्षीय मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याचे मोठे वेड आहे. तो तासनतास मोबाइलच गेम खेळत असतो. सोमवारी तो मोबाइलवर गेम खेळण्यात इतका गुंग झाला की, शाळेची वेळ केव्हा झाली, हे त्याला कळलेच नाही. शाळेची वेळ होऊनही मुलगा मोबाइलच बघत असल्याचे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेत त्याला शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. तो स्कूल बॅग घेऊन शाळेकडे निघाला. काही अंतरावर शेजारी नागरिक उभे होते. तेव्हा त्याच्या शर्टाचे बटण तुटलेले होते. तेव्हा नागरिकांनी त्याला विचारले असता त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. 

अपहरणकर्त्याने आपल्याला पेढा खायला दिला. मात्र, तो खाण्यास नकार दिला. एवढ्यात तोंडावर रुमाल ठेवून नेत असताना कशीबशी आपली सुटका केल्याचे त्याने सांगितले. ही घटना गंभीर असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन बोलावून घेतले. कुटुंबीयांनी त्याला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांचीही तारांबळ उडाली. एपीआय जयप्रकाश निर्मल यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. काहीच गवसले नाही म्हणून सीसीटीव्ही तपासले. यातही घटना उघडकीस न आल्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता शाळेत जायचे नसल्याने असा बनाव रचल्याचे मान्य केले. या प्रकारामुळे पोलिसांसह कुटुंबीयही चक्रावून गेले.कोट

टिव्ही व मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोक्यात अशा कल्पना येत आहेत. त्यामुळे आपला मुलगा मोबाईलवर काय करत असतो. याबाबत पालकाने सतर्क असणे गरजेचे आहे. मुलाला मोबाईलपासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगत विशिष्ट वेळेतच मोबाईल हाताळू द्यावा, असे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी म्हटले. 

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थी