कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 12:27 PM2021-11-28T12:27:56+5:302021-11-28T12:49:13+5:30

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जात असून अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tigress found dead in karwa forest near ballarpur | कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह

कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा उपवन क्षेत्रात बीट क्रमांक ५०० मध्ये शनिवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वाघिणीचामृत्यू नेमका कशाने झाला. याचा उलगडा व्हायचा आहे.

घटनास्थळाच्या अवलोकनावरून वाघिणीचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहे.

शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांचे प्रतिनिधी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विलास ताजणे व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी केले. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी वाघाचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Tigress found dead in karwa forest near ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.