शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

ढाण्या वाघाच्या रस्त्यातच गाडी उभी केली, ताडोबाची दारं कायमची बंद झाली!; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:39 AM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना एका जिप्सीचालकाने वाघासमोर आपली जिप्सी उभी करीत त्याचा रस्ता अडविला.

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना एका जिप्सीचालकाने वाघासमोर आपली जिप्सी उभी करीत त्याचा रस्ता अडविला. यामुळे वाघाच्या मुक्तसंचाराला तर बाधा पोहोचलीच, शिवाय जिप्सीतील पर्यटकांचाही जीव धोक्यात आला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी जिप्सीतील गाईड गवतुरे यांना तत्काळ निलंबित करून पुन्हा ताडोबात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ताडोबा प्रशासनाने तेथील वन्यप्राण्यांचा जिवाला अथवा अधिवासाला धोका पोहोचू नये, पर्यटकांचाही जीव धोक्यात येऊ नये यासाठी विविध नियम व अटी घातल्या आहेत. रविवारी सकाळच्या फेरीत जिप्सी (क्रमांक एमएच ३४ एएम ४०९६) पर्यटकांना घेऊन ताडोबात गेली. दरम्यान, हिलटाप रोडजवळ एक ढाण्या वाघ त्यांना दिसला. जिप्सीचालकाने आगाऊ धाडस दाखवत आपली जिप्सी वाघाच्या समोर उभी केली. वाघ जिप्सीच्या अगदी जवळ आल्यानंतरही हा जिप्सीचालक तिथून हटायला तयार नव्हता. नियमाची पायपल्ली करीत जिप्सी चालकाने दाखवलेल्या आततायीपणामुळे वाघाच्या मुक्तसंचाराला बाधा पोहोचली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तातडीने कारवाई केली. >या प्रकारानंतर गवतुरे नामक गाईडला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. वाघाची वाट अडविणाऱ्या जिप्सीलाही आता ताडोबा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गाईड आणि जिप्सीचालकाला त्यांची बाजू मांडण्यासाठी गुरुवारी कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे.- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प