Three persons were injured in the incident | भरधाव चारचाकीने केले तिघांना जखमी

भरधाव चारचाकीने केले तिघांना जखमी

ब्रह्मपुरी शहरातील धनश्री नित्यानंद चिंतामणे (१८) ही मुलगी आपल्या आईसोबत मार्केटमधून स्कुटीने देलनवाडी येथे असलेल्या घरी जात असताना, नागभीडकडून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या सँट्रो कंपनीच्या एम.एच. ३१ बी.बी. ३३८३ या कारने तिला धडक दिली. यामध्ये सदर मुलगी जखमी झाली. त्यानंतर, सदर कार ही ख्रिस्तानंद चौकात आली असता, या ठिकाणी शाइन कंपनीच्या दुचाकीने आपल्या सिव्हिल लाइन येथील घरी जात असलेल्या रिंकू रहीनखा पठाण (४५) यांना धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर, पुन्हा भरधाव वेगाने चारचाकी वाहनचालकाने तिथून पळ काढला व कारला वडसाच्या दिशेने घेऊन गेला. याची माहिती लगेच पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तेजराम जनबंधू, धनराज नेवारे यांनी कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. त्यानंतर, सदर कार ही आरमोरी येथे गेली व तेथेही सदर कारच्या धडकेत एक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीचे नाव अक्षय तुळशीराम वासनिक (२६) रा. शेळी तह. पवनी जि.भंडारा असे असून, त्याला अटक केली आहे.

Web Title: Three persons were injured in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.