शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कोळसा खाणीत तीन ड्रील मशीन दबल्या; जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:24 AM

कोळसा काढताना मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोळसा काढण्यासाठी खाणीत असलेल्या तीन ड्रील मशीन, १ पंप आणि ओसीबी पूर्णत: ढिगाऱ्याखाली दबल्या.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा काढताना मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोळसा काढण्यासाठी खाणीत असलेल्या तीन ड्रील मशीन, १ पंप आणि ओसीबी पूर्णत: ढिगाऱ्याखाली दबल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास येथून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर असलेल्या पद्मापूर सेक्टर ४ या खुल्या कोळसा खाणीत घडली. यात वेकोलिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.खुल्या खाणीतून कोळसा काढण्याचे काम सुरू असताना दुपारच्या भोजनाची वेळ झाल्याने काही कामगार तेथून बाहेर निघाले होते. काहीजण तिथेच होते. कोळसा उत्खननासाठी आधी तेथील माती काढावी लागते. ही माती बाजूलाच टाकली जाते. यामुळे मातीचे महाकाय ढिगारे खाणीच्या सभाेवताल तयार झाले आहेत. यातील एका बाजूच्या ढिगाऱ्याची माती खचत असल्याचे काही कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथून पळ काढला. यामुळे ते थोडक्यात बचावले. 

 

टॅग्स :Accidentअपघात