चौथ्या दिवशीही पावसाची रिपरीप : चार प्रकल्प १०० टक्के भरलेचंद्रपूर : शुक्रवारपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर चौथ्या दिवशीही कायम होता. सोमवारी २४ तासांत जिल्ह्यात ७८.६ च्या सरासरीने ११७९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील चार प्रकल्प १०० टक्के भरले असून इरई धरणाचे तीन दरवाजे रविवारच्या रात्री ९ वाजता दीड मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरईचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे.शुक्रवारच्या सायंकाळपासून जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरु आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. गेल्या चोविस तासात सर्वाधीक जिवती तालुक्यात १३६.२ तर सावली तालुक्यात १२४.४ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर, अनेकांच्या घरात पाणी शिरले. पावसाच्या जुन, जुलै व आॅगस्ट या महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. मात्र या पावसाने चार प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
By admin | Updated: September 9, 2014 00:16 IST