शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:36 IST

२४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला भारतीय चित्रपट स्ृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे.

माईक पांडे, नागराज मंजुळे येणार : ५० आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेशचंद्रपूर : २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला भारतीय चित्रपट स्ृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. आॅस्कर विजेते माईक पांडे, चित्रपट निर्माते-निर्देशक किरण शांताराम, सैराट चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत २४ तारखेला सायंकाळी ५ वाजता स्थानिक राजीव गांधी अभियांोित्रकी महाविद्यालयात या महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्षस्थानी असतील. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल, माजी न्यायाधीश विकास सिरपुरकर यांची उपस्थिती या महोत्सवात राहणार आहे. निर्देशक चित्रपट विभाग मनिष देसाई तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांतराम पोटदुखे या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यामने तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट अशा ३३ माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जेदार ‘आस्कर’ पुरस्कारांनी सन्मानित अनेक माहिती चित्रपटांचा या सुचित समावेश आहे.या महोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपूर आणि परिसरातील चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण या महोत्सवादरम्यान दिले जाणार आहे. ५० युवक-युवतींना या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. २५ तारखेला माईक पांडे यांचा दुपारी २०३० वाजता सर्वांसाठी मास्टर क्लास होणार आहे. (नगर प्रतिनिधी)