शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची लिपिकाला जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना निवेदन : चिमूर नगर परिषदेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : नगर परिषद स्वच्छता विभागात कार्यरत लिपिक प्रवीण कारेकर यांना प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक सतीश जाधव यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी फोन करून जेसीबीची मागणी केली. लिपिक कारेकर यांनी दोन दिवसानंतर जेसीबी देऊ असे सांगताच नगरसेवकांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.यापूर्वी नगरसेवक सतीश जाधव यांनी लिपिक प्रवीण कारेकर यांच्यासोबत तोंडी बाचाबाची केली होती. तसेच इलेक्ट्रिक विभागातील कर्मचाºयांसोबत सुध्दा अश्लिल वर्तन करून शिविगाळ केली होती. त्यामुळे जाधव यांच्यावर नगरपरिषदतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्या काळ्या फिती लावून नगरसेवकांचा निषेध केला. निवेदन देताना हरिचंद्र डांगे, मिनाज शेख, संजय सेलोकर, प्रवीण कारेकार, शरद पाटील, अधीक्षक चौगुले, हेमंत राहुलवार, सुमित मेश्राम, स्नेहल दाबेकर, विलास चौखे आदी उपस्थित होते.संबधित कर्मचाºयाला २० दिवसांपूर्वी प्रभागातील काम करायला सांगितले होते. मात्र ते काम केले नाही. त्यामुळे त्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी खोटा आरोप केला आहे.- सतीश जाधव,नगरसेवक, नगर परिषद चिमूर

टॅग्स :Socialसामाजिक