शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:49 IST

पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींकडून चिंता : पळस नामशेष होण्याच्या मार्गावर, नवीन पर्याय शोधावा

लोकमत न्यूज नेटवर्कआयुध निर्माणी (भद्रावती) : पोळा सणादरम्यान मेढ्यासाठी बहुगुणी पळस वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बहुगुणी पळस वृक्षांची संख्या कमी होण्याची भिती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे.पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे. पळस वृक्ष ग्रामीण भागातील जनतेसाठी संकटमोचक म्हणून ओळखला जातो. घराला छत म्हणून, भिंतीला पाणी लागू नये म्हणून, तर कधी पत्रावळी व द्रोण म्हणून पळसाच्या पानांचावापर होतो. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास सुरक्षिततेसाठी पळस वृक्षाचा आधार घेतात. व्यावसायिक दृष्टयाही पळसाचे महत्त्व आहे. प्लास्टिक बंदीनंतर पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. पळस झाडावर लाख निर्मिती केली जाते. शेतकरी पळसाच्या मुळापासून शेतीपयोगी दोर बनवितात. पळसामध्ये औषधी गुणधर्महीआहे. अनेक औषधांमध्ये पळसाचा वापर केल्या जाते. मात्र पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पळसाची अवैधपणे कत्तल केली जाते. निसर्ग प्रखर उन्हाळ्यात रखरखीत असतो तेव्हा पळसाची केशरी रंगाची फुले निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत टाकतात. होळी सणात याच फुलांपासून रंगपंचमीचा रंग बनविण्याची प्रथा आहे. मात्र परंपरा जपताना निसर्गाचा समतोल ढासळणार नाही याचेही भान सुशिक्षित पिढीने ठेवणे आता गरजेचे झाले, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनानेच पुढाकार घेऊन सणावारांच्या निमित्ताने होणारी बहुपयोगी पळसाची कत्तल थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण