शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

६५ वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाण्यावरच तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली त्या गावाचे पूनर्वसन झाले. आणि एक नवीन गाव उदयास आले. अगदी तेव्हापासून ते गाव फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवत आहे. एक वर्षापूर्वी तिथे वॉटर एटीएमचे काम करण्यात आले असले तरी अजून हे एटीएम सुरू झालेच नाही.नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले असल्याने गावात जे काही पाण्याचे स्रोत्र आहेत, ते पूर्णपणे फ्लोराईडयुक्त आहेत. परिणामी गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे. प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी लोकांना कळू लागले, तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी ते मागणी करू लागले. २००५ पासून तर ते या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. पण एकाही अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा अनेक वर्ष गांभीर्याने विचार केला नाही. मात्र गावकऱ्यांनी हार पत्करली नाही. त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. आणि अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. या गावात शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम मंजूर करण्यात आले. वर्षभरापूर्वीच वॉटर एटीएम लावण्यातही आले. मात्र वर्षभराचा कालावधी झाला असला तरी हे वॉटर एटीएम सुरू झालेच नाही. परिणामी नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी