शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या शिक्षणावर संकट येणार

By admin | Updated: January 4, 2017 00:53 IST

गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे.

विरा साथीदार : शिक्षणावर जाहीर व्याख्यान चंद्रपूर : गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे. त्यामुळे येणारा काळ गरिबांच्या शिक्षणाचे मोठे संकट घेवून येणार आहे. भारतीय राज्य घटनेनुसार शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे दिली असताना आता विदेशी कंपन्या आपले शिक्षण ठरवणार असल्याने शिक्षणासाठी मोठे आंदोलन करायची गरज आहे, असे आवाहन ‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी नामांकन झालेला 'कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि विचारवंत विरा साथीदार यांनी केले. येथील राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात बाबुपेठ येथील दिशा महिला समितीने आयोजित केलेल्या ‘डॉ. बाबासाहब आंबेडकरांना अपक्षित शिक्षण आणि आजची परिस्थिती’ या जाहीर व्याख्यानात साथीदार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार मुकेश वाळके होते. यावेळी प्रमुख पाहुणे विदर्भवादी नेते किशोर पोतनवार, आंबेडकरी आंदोलनाचे प्रा. एस.टी. चिकटे, दिशा महिला समितीच्या ज्योतीताई मेश्राम, महाकुलकर, शाहिदा शेख, असीम मेश्राम आदी उपस्थित होते. अभिनेते साथीदार म्हणाले, आजचे शिक्षण भांडवलदारांची गरज लक्षात घेऊन दिले जात आहे. त्यामुळे आता हा प्रश्न बेरोजगार, युवक आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की, बाबासाहेबांना अपेक्षित शिक्षण नव्या पिढीला कसे मिळेल? ते पुढे म्हणाले, कुटुंब संस्थेचा जन्म कसा झाला, हे कळल्याशिवाय सामाजिक समस्यांची उकल होणार नाही. त्यासाठीच समाजवादी जाणिवेची मानवतावादी संवेदना असलेल्या शिक्षणाची खरी गरज आहे. शिक्षणाने सुजाण झालेल्या पिढीशिवाय सामाजिक-आर्थिक समानतेची भाषा बोलणारी चळवळ उभी राहणार नाही. खरं तर शिक्षणाच्या हक्कांची मागणी महात्मा जोतीराव फुले आणि कार्ल मार्क्सच्या कालप्रवाहाएवढी जुनी आहे. कारण जेथे विषमता असते, तेथे आधी शिक्षणच हिरावले जाते. सत्ता कधीच निरपेक्ष नसते. असे साथीदार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. चिकाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा साठी दिशा महिला समितीच्या सर्व सदस्यांनीे अथक परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)