लग्न वऱ्हाड्याचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:42+5:30

वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पल्टी झाली व महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. नि. जांभळे संपूर्ण ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना आधी भिसी येथील प्रा. आ. केंद्रात आणून उपचार करण्यात आले व गंभीर जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

The wedding car overturned; Death of both | लग्न वऱ्हाड्याचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू

लग्न वऱ्हाड्याचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
आंबोली : भिसी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रूझर हे चारचाकी वाहन (एमएच ३२ एएच ०९५७)  आंबोलीकडे जात असताना  रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान पुयारदंड गावाजवळील दिलीप शहाणे यांच्या शेताजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन तीनवेळा पलटी झाले. यात आंबोली येथील रहिवासी श्रीराम राजेराम मानकर (५२), तसेच कमल मानकर (७०) यांचा मृत्यू झाला  तर नऊ जण जखमी झाले आहेत.
वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पल्टी झाली व महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. नि. जांभळे संपूर्ण ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना आधी भिसी येथील प्रा. आ. केंद्रात आणून उपचार करण्यात आले व गंभीर जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

जखमी व्यक्तींमध्ये यांचा समावेश
- वाहनचालक अमोल किसन वाघ ( २७,रा. भिसी ),  गार्गी संजय मानकर (४),  लक्ष्मण गायकवाड ( ६७, रा. आंबोली),  स्वाती मानकर (२१, रा. आंबोली ), शांता दडमल  (४९, रा. आंबोली ),  ज्योत्स्ना मानकर ( ३७,  आंबोली),  नीळकंठ  जांभुळे  (५७, रा. आंबोली),  भगवान गुडधे (७०, रा.आंबोली ) यांचा समावेश आहे.

Web Title: The wedding car overturned; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात