शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

बापाने हातरुमालाने आवळला 10 वर्षीय दिव्यांग मुलीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 11:22 PM

हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांनी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १० वर्षीय दिव्यांग मुलीची हातरुमालाने गळा आवळून बापानेच हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आपले बिंग फुटू नये म्हणून मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, डॉक्टरांना संशय येताच तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आठवडाभरानंतर शवविच्छेदन अहवाल आला अन् सारा प्रकार पुढे आला. चित्रपटात शोभावी, अशी ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील श्यामनगर येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. विजय नारायण बारापात्रे (४६, रा. श्यामनगर) असे आरोपी बापाचे नाव आहे. तर मृणाली विजय बारापात्रे (१०) असे मृत मुलीचे नाव आहे.विजय बारापात्रे याची मुलगी मृणाली नावाची मुलगी दिव्यांग होती. ती उठत बसत नसल्याने ती बेडवरच झोपून राहत होती. तिची प्रात:विधी आई- वडिलांनाच करावी लागत होती.२३ सप्टेंबरला मुलीची आई बाहेर गेली होती. दरम्यान, त्या मुलीने बेडवरच शौच केली. हा प्रकार बघितल्यानंतर संतापलेल्या बापाने हातरुमालाने मुलींचा गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, पोलीस हवालदार सुदाम राठोड, पोलीस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने तपास करीत बापाला अटक केली. पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले करीत आहेत.

 नैसर्गिक मृत्यू दाखविण्यासाठी केले रुग्णालयात भरतीहत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांनी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले यांनी तपास करून वडिलांना ताब्यात घेतले. त्याला खाकी हिसका दाखवला असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी कलम ३०२, २०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस