शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:31 IST

..पण या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे कुठे होते? पडद्यामागे नेमके काय काय घडले? यासंदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

 'दैव देतं अन् कर्म नेतं' ही म्हण चंद्रपूरमध्ये काँग्रेसला तंतोतंत लागू होताना दिसून आली. चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस सत्तेजवळ पोहोचली खरी, पण, पक्षांतर्गत मतभेत दूर करता करता आणि नंतर बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याची जुळवता जुळव करता करता पक्षाची पुरती दमछाक उडाली आणि हाता-तोंडाशी आलेली सत्ता निसटली. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ दिली आणि भाजपचा महापौर झाला. तर शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले. 

पण या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे कुठे होते? पडद्यामागे नेमके काय काय घडले? यासंदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय कळवला होता, असे गिऱ्हे यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना गिऱ्हे म्हणाले, "निवडणुकांपूर्वी आणि नंतरही काँग्रेस पक्षाकडून वारंवार-वारंवार ज्या पद्धतीने अपमान होत होता, हे आम्ही, वरून देसाई साहेब आणि सुषमा ताई यांच्या माध्यमाने उद्धवजींपर्यंत पोहोचवले होते. संजय राऊत साहेब आमचे मोठे नेते आहेत. काल आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आमचे संपर्क प्रमुख मुंबईहून येथे आले होते. तसेच, वरून सरदेसाई हे प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते. सुषमा ताईही संपर्कात होत्या. त्यांना मी संपूर्ण परिस्थिती समजावून, हा मेसेज उद्धवजींपर्यंत पोहोचवला होता. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा निर्णय घेतला."

कारण शेवटी, पक्ष टिकायला हवा, कार्यकर्ता टिकायला हवा. त्यासाठीच ही भावना होती. मला विश्वास आहे की, आमचे पक्षप्रमुख असोत किंवा संजय राऊत साहेब असोत, आमच्या कार्यकर्त्यंच्या भावना समजून घेतील आणि पक्षाला काल जे उपमहापौरपद मिळाले, उद्या स्टँडिंग कमिटीचे पदही शिवसेनेकडे राहणार आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मातोश्रीवर जाऊन आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत," असेही संदिप गिऱ्हे यांनी यावेळी सांगितले. 

...अन् भाजपनं महापौरपद खेचून आणंल -खरे तर, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिस्तबद्ध मतदानाची रणनीती आखली. मतदानाआधी भाजपने जारी केलेला व्हीप महत्वाचा ठरला. भाजपा आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी एकजुटीने मतदान करत महापौरपद भाजपाकडे खेचून आणले. उपमहापौरपद उद्धवसेनेला देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरली.

असं झालं सत्तेचं वाटप -आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपाचा असेल, नंतरचे सव्वा वर्षे महापौर उद्धवसेनेचा असेल. 

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले की, "काँग्रेस आम्हाला शेवटच्या वर्षातही महापौर द्यायला तयार नव्हती. त्यामुळे आम्हाला भाजपासोबत जावे लागले. नंतरच्या सव्वा वर्षात महापौर उद्धवसेनेचा असेल. पाच वर्षे उपमहापौर उद्धवसेनेचा असेल. स्थायी समितीही पहिले एक वर्ष आणि शेवटचे एक वर्ष उद्धवसेनेकडे असेल", अशी माहिती गिऱ्हे यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Sena supports BJP in Chandrapur; Uddhav knew about it?

Web Summary : In Chandrapur, Shiv Sena (Thackeray) backed BJP for mayor after Congress faltered. Sandeep Girhe claims Uddhav Thackeray was informed and guided the decision, prioritizing party survival. Power sharing includes deputy mayor and committee positions for Sena.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार