शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

दहा दिवसापूर्वीच डाॅ. शीतल आमटेंनी बदलला मोबाईलचा पासवर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST

राजेश भाेजेकर चंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे आत्महत्या वा घातपात आहे ही ...

राजेश भाेजेकर

चंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे आत्महत्या वा घातपात आहे ही बाब अद्याप स्पष्ट झाली नसली तरी डाॅ. शीतल यांनी आठ-दहा दिवसांपूर्वीच आपल्या मोबाईल, टॅब व लॅपटाॅपचे पासवर्ड बदलले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डाॅ. शितल यांचे पती गौतम करजगी यांनाही हे पासवर्ड माहीत नाही. ही बाब सायबर सेलच्या तपासात पुढे आल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‌‘लोकमत’ला दिली.

उल्लेखनीय, डाॅ. शीतल यांचे दोन मोबाईलसह टॅब व लॅपटाॅप पोलिसांनी ताब्यात घेत आहे. यामध्ये एक मोबाईल ॲपल कंपनीचा आहे. या मोबाईलला डाॅ. शीतल यांनी स्वत:चे ‘डोळे’ पासवर्ड ठेवले आहे. जोपर्यंत मोबाईलचे स्क्रीन डाॅ. शीतल यांचे डोळे ‘स्कॅन’ करणार नाही तोपर्यंत हा मोबाईल उघडणार नाही. हा पासवर्ड तोडण्यासाठी चंद्रपूर सायबरचे प्रयत्न निष्फळ ठरले. मोबाईल, टॅब व लॅपटाॅप पासवर्ड तोडण्यासाठी नागपूरला पाठविले असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.

बाॅक्स

डाॅ. शीतलचा मोबाईल बोलणार

डाॅ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असावी, याबाबीचा अद्याप उलगडा झालेला नाही. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौफेर चौकशी केली तरी काहीही हाती लागले नाही. महत्त्वाचा पुरावा म्हणून पोलीस मोबाईल, टॅब व लॅपटाॅपकडे बघत आहे. येथेही पासवर्डचा व्यत्यय आला आहे. त्यात काय दडले आहे. याची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

डाॅ. शीतल यांची खोली गौतम करजगींच्या हवाली

डाॅ. शीतल आमटे ज्या खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी तपासपूर्ण करून ही खोली डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांच्या हवाली केली आहे.

मृत्यू कशानेही असो, पोलिसांना शोधावे लागणार कारण

मृत्यूचा शोध घेणारे काही धागेदोरे गवसल्याचे पोलीस सूत्र सांगत असले तरी यामागील नेमक्या कारणांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत असल्याची माहिती आहे.

फाॅरेन्सिक लॅबला एसीपींचे खास पत्र

प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमधून काहीही निष्पन्न झाले नाही. फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा अहवाल जलगतीने प्राप्त व्हावा, यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागपूरच्या फाॅरेन्सिक लॅबला खास पत्र पाठवून अहवाल लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केल्याचे समजते.

आमटे कुटुंबीयांचे बयाण नोंदवणार

डाॅ. शीतलच्या मृत्यूवर आमटे कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी आनंदवनातील काही लोकांची चौकशी केली. आमटे कुटुंबीय प्रचंड धक्क्यात असल्यामुळे त्यांचे बयाण नोंदविले नव्हते. परंतु, प्रकरण रहस्यमय बनल्याने पोलीस आमटे कुटुंबीयांचे बयाण नोंदविणार आहे.