श्रावण मासातही भाविकांसाठी मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:52+5:30
श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ऑगस्टला असून मुगाची शिवमुठ आहे. ११ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. चौथा श्रावण सोमवार १७ ला असून जवसाची शिवमुठ आहे.

श्रावण मासातही भाविकांसाठी मंदिर बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र समजला जातो. संपूर्ण महिन्यातील प्रत्येक सोमवारला श्रावणी सोमवार म्हणून उपवास केला जातो. महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगावर बेलपाने आणि शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिर बंद असल्याने शिवभक्तांना यावर्षी घरीच राहून पूर्जाअर्चना करावी लागत आहे.
श्रावण महिना २१ जुलैला सुरु झाला आणि १९ ऑगस्टला संपणार आहे. याच महिन्यात रक्षाबंधन, पोळा , श्रीकृष्ण जन्माष्टमी आदी सण आहेत. मात्र, यावर्षी सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरे करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, रक्षाबंधनाच्याही सणाला भाऊ-बहीणही एकमेकांपर्यंत कोरोनामुळे पोहोचू शकणार नसल्याने बहिणीने पोष्टाने पाठविलेली राखी भावाला हातावर बांधावी लागणार आहे. बहिणभावाच्या या सणावरही यावर्षी विरजण पडले आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ऑगस्टला असून मुगाची शिवमुठ आहे. ११ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. चौथा श्रावण सोमवार १७ ला असून जवसाची शिवमुठ आहे. १८ ला पोळा तर १९ ऑगस्टला श्रावण मासाची समाप्ती आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारला दरवर्षी शिवमंदिरात भाविकांच्या रांगा लागतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वांनी मंदिरात न जाता घरीच पूजा अर्चा करावी लागणार आहे.
श्रावणमासाचे सर्व महिन्यात सर्वश्रेष्ट स्थान असून निसर्गही या कालावधीत हिरवा शालू पांघरत असल्याने सर्वत्र आनंद असतो. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचा आंनद हिरावला आहे.