चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात चंद्रपुरात येवून स्थायी झाले आहे. यात वेकोलि क्षेत्रात काम करणाऱ्या तेलगू भाषिकांची संख्या अधिक आहे. लालपेठ, महाकाली कॉलरी, नांदगाव या भागात यांची संख्या लक्षणीय आहे. असे असले तरी या भागात एकही तेलगू समाज भवण नाही. त्यामुळे सामाजिक किंवा, घरगुती कार्यक्रम करण्याकरिता येथील नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता लालपेठ येथे तेलगू समाज भवणाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी यंग चांदा बिग्रेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी केली असून मागणीचे निवेदन आमदार किशोर जोरगेवार यांना दिले. आमदार जोरगेवार यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी कलाकार मल्लारप, आदी गिरवेनी, व्यंकटेश सूरा, रमेश पारनंदी, रमेश जोरीगल, सत्यम महेश्वर, अमीत कोरकोपुलवार, वेनू कोडेल, संपत कडम, सिनू कोडारी आदी उपस्थित होते.
लालपेठ येथे तेलगू समाज भवण बांधावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST