चिप्स आणायला गेलेल्या मुलीची छेड; चंद्रपुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 21:22 IST2023-09-29T21:21:54+5:302023-09-29T21:22:08+5:30
शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

चिप्स आणायला गेलेल्या मुलीची छेड; चंद्रपुरातील घटना
चंद्रपूर : चिप्स आणायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीची एका इसमाने छेड काढल्याची घटना बुधवारी चंद्रपुरात समोर आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३५४ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मुकेश खुशाल शाहू असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पीडित मुलगी वडिलाच्या गाडीवर बसून चिप्स खरेदी करायला गेली होती. वडील गाडी पार्क करत असताना ती मुलगी जवळच्या दुकानातून चिप्स खरेदी करून परत येत होती. दरम्यान मुकेश शाहू याने तिची छेड काढली. यावेळी पीडिताने आरडाओरड केली. तिचे वडील धावत आले. त्यांनी मुकेशला पकडून रामनगर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान रामनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे व त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. मुकेश शाहू हा होमगार्डमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.