शिक्षकांचे पगार बिल लिपिकाच्या कपाटात बंद
By Admin | Updated: May 8, 2014 01:46 IST2014-05-08T01:46:44+5:302014-05-08T01:46:44+5:30
बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्यातील पगार एप्रिल महिन्याच्या अखेरीस मिळाला. मात्र मार्च महिन्याचे वेतन अद्यापही शिक्षकांना मिळाले नसल्याने शिक्षकांना

शिक्षकांचे पगार बिल लिपिकाच्या कपाटात बंद
आर्थिक ताण : वेतन वेळेवर देण्याची शिक्षकांची मागणी
चंद्रपूर : बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्यातील पगार एप्रिल महिन्याच्या अखेरीस मिळाला. मात्र मार्च महिन्याचे वेतन अद्यापही शिक्षकांना मिळाले नसल्याने शिक्षकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या महिन्याचे बिल येथील लिपिकाच्या कपाटात बंद असून लिपिक सुटीवर गेल्याचे अखिल बल्लारपूर प्राथमिक शिक्षक संघाचे म्हणणे आहे. वेतन त्वरित देवून शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पंचायत समिती बल्लारपूरचे आवंटन २५ एप्रिलला आल्याचे समजते. वास्ताविक २२तारखेपर्यंत देयक लिपीकाने तयार करून लेखा विभागास सादर करावे, असे शासकीय निर्देश आहे.मात्र संबंधित लिपीक ३0 तारखेला बिल बनवून बीईओची स्वाक्षरी घेतात. बील स्वत:च्या कपाटात ठेवून चार- पाच दिवसाच्या किरकोळ रजेवर निघून जातात. असा आरोप शिक्षक संघाने केला आहे. संबंधित लिपीकाचा टेबल बदलविला नाही तर, अखिल बल्लारपूर प्राथमिक शिक्षक संघ आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे सुनिल कोवे, सुरेश नगराळे, धम्मदीप दखणे, सतीश बावणे, प्रमोद उरकुडे, सरोज नागतुरे, पुष्पलता गाडगे, मीना गादम, उषा बंदेलवार, मधुसूदन टोंगे, महादेव लांडे, राजेश अडगूरवार, डाहुले, वाघमारे, वंजारी मेश्राम, लोहे, सोयाम आदींनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)