शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोवरी परिसरात तापाची साथ

By admin | Updated: September 9, 2014 23:23 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात मलेरियासदृश तापाची साथ सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हरदोना : राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात मलेरियासदृश तापाची साथ सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोवरी परिसरातील पोवनी, चिंचोली (खुर्द), माथरा, अंतरगाव, निंबाळा, साखरी, बााबापूरर, मानोली परिसरातील मलेरियासदृश तापाने थैमान घातले आहे. एका कुटुंबातील तीन ते चार सदस्यांना तापाने ग्रासले आहे. या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली (बु.) येथे आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा आहे. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्याचा आाधार घ्यावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करीत रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक असते. परंतु प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाने गावात धूर फवारणी केली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील बहुसंख्य गावात तापाने कहर केला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यल्प सुविधा आहे. त्यातही डॉक्टर मिळेल याची शास्वती नाही. त्यामुळे अनेक नागरिक शहरातील रुग्णालयात धाव घेत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अनेक गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.आरोग्य विभागाने गोवरी परिसरातील गावात आरोग्य शिबिर लावून नागरिकांची तपासणी करावी, तसेच स्वच्छता मोहीम राबवावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)