ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:23 PM2018-09-24T23:23:21+5:302018-09-24T23:23:40+5:30

मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. यावेळी ढोलताशे, डिजेच्या तालावर गणेशभक्तांची पावले अविरत थिरकत होती. चंद्रपूरसह आजुबाजुच्या गावांवरून आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग फुलून गेले होते.

Talk to Bappa in the shadows of Dholashas | ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

Next
ठळक मुद्दे८,८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन : रस्ते गणेशभक्तांनी फुलले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. यावेळी ढोलताशे, डिजेच्या तालावर गणेशभक्तांची पावले अविरत थिरकत होती. चंद्रपूरसह आजुबाजुच्या गावांवरून आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग फुलून गेले होते.
चंद्रपुरातील लोकांनी विसर्जन काळात अधिकाधिक मूर्र्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाला साथ दिली. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. महानगरपालिकेतर्र्फे जटपुरा गेटवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा शब्दात भाविकांचा गजर होत होता.
गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी ४ वाजता गांधी चौकातून सुरु झाली. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत होते. मंडळांनी पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्यादरे जनजागृती केली. दरम्यान, विसर्जन प्रसंगी २ ते ३ वेळा रुग्णवाहिका जात असताना रुग्णवाहिकेस जाण्यास वाट मोकळी करून देण्यात आली. कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत सात हजार ७८५ मातीच्या मूर्ती व एक हजार ८० पीओपी अशा एकूण आठ हजार ८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
सफाई कामगार २४ तास
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना तीन शिफ्टमध्ये काम वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करीत होते. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत स्वच्छ केले.

Web Title: Talk to Bappa in the shadows of Dholashas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.