घुग्घुस : येथील प्रयास मंचच्या वतीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दहा बालकांच्या जळीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. पीडितांना आर्थिक मदत द्यावी, दोषीवर तत्काळ कारवाई व संबंधित डॉक्टर, नर्स, व जिल्हा शल्य चिकित्सकांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणीचे निवेदन घुग्घुस पोलीस ठाण्यात देण्यात आले.
प्रयास मंच अध्यक्ष किरण बोढे यांनी ही मागणी केली आहे. यावेळी प्रयास सखी मंचच्या मुख्य मार्गदर्शिका अर्चना भोंगळे , जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती नीतू चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते, नंदा कांबळे, सुचिता लुटे, सामाजिक कार्यकर्त्या सरस्वता पाटील, सौभाग्या तांड्रा, सुनीता पाटील, नाझिमा कुरेशी, सुलभा ठाकरे, सपना मांढरे, निषाद शेख, नफिसा खान, अनिता लालसरे, नाझिया शेख, सुनंदा लिहितकर उपस्थित होत्या.