‘ताडोबा’ला १२ कोटींचा गंडा; ईडीची धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:37 IST2025-01-12T06:36:34+5:302025-01-12T06:37:19+5:30
ताडोबा पर्यटनासाठी चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स आणि ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार झाला होता.

‘ताडोबा’ला १२ कोटींचा गंडा; ईडीची धाड
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स (डब्ल्यूसीएस) कंपनीचे संचालक ठाकूर बंधू यांनी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२.१५ कोटींचा ताडोबाला गंडा घातला होता. या प्रकरणाची मे २०२४ मध्ये ईडीकडे तक्रार झाली होती.
दरम्यान, बुधवारी पहाटे ४ वाजता नागपूर येथून पाच ते सहा इनोव्हा गाड्यांतून आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाच्या २५ अधिकाऱ्यांनी सरकारनगर येथील बंगल्यावर तसेच त्यांच्या प्रतिष्ठानावर धाड टाकून कागदपत्रांची पाहणी केली. त्यामुळे चंद्रपुरात पुन्हा एकदा ताडोबा बुकिंग घोटाळा चर्चेला आला आहे.
ताडोबा पर्यटनासाठी चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स आणि ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार झाला होता.