शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची मराठवाड्याकडे धाव

By admin | Updated: June 4, 2014 00:00 IST

ज्या जिल्ह्याचा पुरावा असेल त्याच जिल्ह्यातून जात प्रमाणपत्राचा दाखला काढावा, असा शासन निर्णय असल्याने जिवती तालुक्यातील पहाडावर राहणार्‍या शेकडो नागरिकांच्या जात प्रमाणपत्रांच्या मार्गात

शैक्षणिक नुकसान : शासन निर्णयाचा अडथळाजिवती : ज्या जिल्ह्याचा पुरावा असेल त्याच जिल्ह्यातून जात प्रमाणपत्राचा दाखला काढावा, असा शासन निर्णय असल्याने जिवती तालुक्यातील पहाडावर राहणार्‍या शेकडो नागरिकांच्या जात प्रमाणपत्रांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. शासन निर्णयामुळे गोत्यात आलेल्या नागरिकांनी आता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मराठवाड्यातील जिल्ह्यांकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जिवती तालुका हा अतिशय दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागातील जनता डोंगराच्या माथ्यावर व पायथ्याशी शेती करतात. पूर्वी हा तालुका राजुरा व कोरपना तालुक्यात समाविष्ट होता. २00२ नंतर जिवती तालुक्याची निर्मिती झाली. त्यापूर्वी हा तालुका निजामशाहीच्या ताब्यात होता. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नागरिक नांदेड, परभणी, लातूर, बीड, औरंगाबाद येथील रहिवासी होते. सन १९६२, १९६७ व १९७२ या निजामशाहीच्या काळात सर्व नागरिक उपजीविकेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पुनर्वसित झाले.ज्या जिल्ह्यांचा पुरावा असेल, त्याच जिल्ह्यातून जातप्रमाणपत्राचा दाखला काढावा असा शासन निर्णय सप्टेंबर २0१३ मध्ये लागू करण्यात आला. त्यामुळे येथील शेकडो नागरिकांना या तालुक्यात प्रमाणपत्र काढणे शक्य होत नाही. येथील नागरिक स्थलांतरित असल्याने त्यांच्यामागे कोणतेही नातेवाईक नाहीत. त्यामुळे जन्माचे पुरावे मिळविणे अतिशय गंभीर प्रश्न झाला आहे. या नागरिकांनी आता मराठवाड्यातील जिल्हे पिंजून पुरावा शोधण्याचे काम हाती घेतले असून, याकरिता तेथील तलाठी, तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या विनवण्या करीत आहेत. पण अद्याप एकालाही पुरावा प्राप्त झालेला नाही. आता मुलांच्या शिक्षणाकरिता जातप्रमाणपत्राची गरज भासते. त्यामुळे नागरिक कमालीचे अडचणीत आले आहे. शासन निर्णयातील ही अट रद्द केल्यास जातप्रमाणपत्र निघू शकते, असे अन्नाराव मोटे, प्रल्हाद मदने यांचे म्हणणे आहे. जिवती तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)