शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वपरवानगीशिवाय शिक्षक बनले विद्यार्थी

By admin | Updated: June 8, 2014 23:46 IST

जिल्ह्यातील काही शिक्षकांनी पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. नोकरी करीत असतानाच बी.एड्.ला प्रवेश घेऊन एकाच वेळी शिक्षण आणि शिक्षकाची नोकरी करीत शासनाची दिशाभूल केली आहे.

साईनाथ कुचनकार -चंद्रपूरजिल्ह्यातील काही शिक्षकांनी पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे.  नोकरी करीत असतानाच बी.एड्.ला प्रवेश घेऊन एकाच वेळी शिक्षण आणि शिक्षकाची नोकरी करीत शासनाची दिशाभूल केली आहे. मात्र पूर्वपरवानगीशिवाय विद्यार्थी बनलेल्या या शिक्षकांवर गडांतर येणार असून कारवाईला त्यांना समोर जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षक आहे. मात्र यातील काही शिक्षकांनी बीएड् पदवी प्राप्त करून पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. नोकरी करीत असतानाच शासनाची कोणतीही परवानगी न घेता बीएड्ला प्रवेश घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर, शाळेमध्ये ज्या दिवशी हजेरी आहे त्या दिवशी बीएड् महाविद्यालयामध्येसुद्धा हजेरी लावली. त्यामुळे या शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविले की, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या सर्व शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षकांनी बी.एड् केले. ज्या शैक्षणिक वर्षात कोणताही रजेचा अर्ज जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला नाही. अनधिकृतपणे शाळेत गैरहजर राहून परस्पररित्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन बी.एड्. अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढेच नाही तर, अभ्यासक्रमानंतर मिळालेल्या पदवीनुसार पदोन्नतीसाठी प्रशासनाकडे अर्जसुध्दा केला आहे. बीएड् अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संस्थेमध्ये ७५ टक्के कालावधीची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. असे असतानाही शिक्षकांनी रजा न घेता बीएड्चा अभ्यासक्रम नियमितपणे पूर्ण केला आहे.प्रशासनाने शिक्षकांना बीएड करण्याबाबत पूर्व परवानगी दिली नसतानाही शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. काही शिक्षकांनी वैद्यकीय रजा दाखवून, शाळेमध्ये अनधिकृतरित्या गैरहजर राहिले आहे. मात्र त्याच वेळी बीएड महाविद्यालयामध्ये त्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठिक नसतानाही ते बीएड महाविद्यालामध्ये गेलेच कसे, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल करणार्‍या या शिक्षकांची प्रशासकीय चौकशी करून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.