दारू विक्री व तस्करीविरूद्ध कठोर पाऊल उचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:44+5:302021-01-25T04:28:44+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू विक्री व तस्करीबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने विशेष ...

दारू विक्री व तस्करीविरूद्ध कठोर पाऊल उचला
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू विक्री व तस्करीबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करून तातडीने कठोर पाऊल उचलावे, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना शुक्रवारी दिले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, रस्ते महामार्गच्या पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर डोमकर, उपअधीक्षक शेखर देशमुख व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव, कोविड १९ नियंत्रण परिस्थिती, लसीकरणाबाबत माहिती घेऊन आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
दोषसिद्धीत चंद्रपूर जिल्हा राज्यातून दुसरा
हत्या व हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्हे घडल्यानंतर दोषसिद्धीत चंद्रपूर जिल्हा राज्यातून दुसरा तर सेशन व जेएमएफसी कोर्ट दोषसिद्धीत सातवा आहे. पोलीस प्रशासनातर्फे महिला विरुद्ध गुन्हे तपासाकरिता नऊ पोक्सो गुन्हे तपास पथक गठित करण्यात आले. पोलीस सारथी उपक्रम व भरोसा सेल उपक्रम सुरू असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आढावा बैठकीत दिली.