शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेच्या विरोधात बाम्हणी येथे रास्ता रोको

By admin | Updated: April 13, 2016 01:16 IST

नागभीड नगरपरिषदेत समावेश केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बाम्हणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नागरिकांत रोष : बाम्हणी, डोंगरगाव, नवखळा, भिकेश्वरचा विरोधनागभीड: नागभीड नगरपरिषदेत समावेश केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बाम्हणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात इतर समाविष्ट गावांनीही सहभाग घेतला. दरम्यान, भिकेश्वर येथील शेकडो नागरिकांनी येथील तहसीलदारांना निवेदन देवून आमचे गाव नगरपरिषदेतून वगळा अशी मागणी केली.सोमवारी नगरविकास विभागाने एक अधिसूचना प्रसिद्ध करुन नागभीडला नगरपरिषदेचा दर्जा बहाल केला. या प्रस्तावित नगरपरिषदेत नागभीड नवखडा, सुलेझरी, तिवर्ला गावगन्ना,तिवर्ला तुकूम, बाम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, खैरी चक पारखी भिकेश्वर डोंगरगाव व चिचोली खुर्द या गावांचा समावेश राहील. असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. ही अधिसूचना जाहीर होताच काही गावात असंतोष निर्माण झाला.या असंतोषाचे पर्यावसान मंगळवारी बाम्हणी येथे दिसून आले. नवखळा, बाम्हणी बोथली आणि डोंगरगाव येथील लोक शासनाच्या या निर्णयाविरोधात एकत्र आले आणि रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास अर्धा तास हे रास्ता रोको आंदोलन चालले. या आंदोलनाची नागभीडचे तहसीलदार समीर मानेयांनी दखल घेत आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान नागभीड नगरपरिषदेत समावेश करण्यात आलेल्या भिकेश्वर येथील शेकडो नागरीकांनी तहसील कार्यालयात येवून नगरपरिषदेतून आमचे गाव वगळा या मागणीचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)माझा नगरपरिषदेला विरोध नाही. पण ग्रामीण जनतेच्या मानसिकतेचा विचार करुन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. नागभीडच्या विकासासाठी ग्रामपंचायतही सक्षम होती. या निर्णयाने ग्रामीण भागाच्या अडचणी वाढणार आहेत. योग्य पदाधिकारी मिळाले तर ग्रामपंचायतही नगरपरिषदेपेक्षा जास्त विकास करु शकते. हे बाम्हणी, सुलेझरी, भिकेश्वर नवखळा येथील ग्रामपंचायतींनी सिद्ध केले आहे.- प्रफुल्ल खापर्डे, माजी सभापती जि.प. चंद्रपूरनिर्माण झालेले वातावरण लक्षात घेऊन बाम्हणी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार बी.डी. मडावी स्वत: बाम्हणी येथे हजर होते. एवढेच नाही तर ज्या गावांना नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आला आहे त्या गावातही पोलीस तैनात करण्यात आले होते. नागभीड व इतर समाविष्ट गावांचे प्रशासक म्हणून नागभीडचे तहसीलदार समीर माने यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.