लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : युती-आघाडीमधील चर्चेचे गुन्हाळ सुरू असताना अनेक इच्छुकांनी देवदर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. काहींनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार नवनवीन खड्याच्या अंगठ्या बोटात चढविल्या आहेत, तर काहींच्या मनगटावर नवे गंडेदोरे गुंडाळले गेले. काहींनी यज्ञयाग, शांती मंत्रतंत्रांचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.
अनेकांचे बुवा, बाबा, आध्यात्मिक गुरू ठरलेले असून, त्यांच्याकडील येरझाऱ्या वाढल्या आहेत. अगोदर सीट मिळवायची आहे. मग ती जिंकून अजून पुढील पाच वर्षांकरिता राजकारणातील वाट सुकर करायची आहे. काहींना बुवाबाबांनी रोज कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे याचे आदेश दिले असल्याची चर्चा आहे.
इच्छुकांची धावाधाव
बोटांतील जुन्या अंगठ्या जाऊन गुरू, पाचू, पोवळे, नवग्रहाच्या नव्या अंगठ्या चढविल्या आहेत. इच्छुकांनी देव-देवतांचे, महाकालीचे दर्शन घेत आहेत.
वास्तुशास्त्रानुसार रचना
जनसंपर्क कार्यालयात बसण्याच्या खुर्चा, टेबलची मांडणी पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण अशा दिशा पाहून नवीन रचना केलेय. वास्तुशास्त्र, ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार कार्यालयातील रचना, रंगरंगोटी केली आहे.
Web Summary : As alliance talks continue, election aspirants are turning to astrology, wearing gemstone rings, tying sacred threads, and consulting spiritual gurus for success. They're even changing office layouts based on Vastu Shastra.
Web Summary : गठबंधन की चर्चा के बीच, चुनाव के इच्छुक उम्मीदवार ज्योतिष का सहारा ले रहे हैं, रत्न की अंगूठियां पहन रहे हैं, पवित्र धागे बांध रहे हैं और सफलता के लिए आध्यात्मिक गुरुओं से सलाह ले रहे हैं। वे वास्तु शास्त्र के अनुसार कार्यालय लेआउट भी बदल रहे हैं।