शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून महाकाली यात्रेला प्रारंभ

By admin | Updated: April 12, 2016 03:29 IST

जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. महाकाले परिवार

चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. महाकाले परिवार आणि बाराही महिने देवीच्या नतमस्तकी होणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात येणार आहे.जिल्ह्याचे आराध्यदैवत देवी महाकाली आहे. एप्रिल महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा येथे भरते. यात्रा कालावधीत देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापुर आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ऐतिहासिक जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट येथे नारळ फोडून देवी महाकालीच्या नावाचा गजर करीत भाविक मंदिराकडे रवाना होतात. गुडीपाडव्यापासूनच भाविकांचे लोंढे चंद्रपुरात दाखल होत आहे. सध्या भाविकांची संख्या कमी असली तरी १५ एप्रिलपासून ती वाढणार आहे. मंगळवारी पहाटे माता महाकालीची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी देवीला अलंकारही परिधान करण्यात येतील. महिनाभर म्हणजे अक्षय्यतृतीयेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर हारफुलांसह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. यात्रेची सुरुवात गोंडराजाची महाराणी हिराई यांनी १७१४ रोजी केली. आजही यात्रेची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. (प्रतिनिधी)४०० होमगार्डसह पोलिसांचा पहारा४यात्रेदरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर यात्रेदरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिपर्यंत २०० पुरूष होमगार्ड, २०० महिला होमगार्डसह शहर पोलिसांचा ताफा यात्रा परिसरात तैनात राहणार आहे. १७ तारखेनंतर बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. गोंडराजे वीरेंद्रशहा यांच्या हस्ते पूजा४दरवर्षीप्रमाणे उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता महाकाली यात्रेच्या शुभारंभ दिनी आराध्य दैवत माता महाकालीची पूजा गोंडी पद्धतीने चंद्रपूर चंद्रपूरचे गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राजे वीरेंद्रशहा आत्राम यांच्या समाधी वॉर्डातील वाड्यातून गोंडी नृत्य व गोंडी वाद्यासह वाजतगाजत मिरवणूक निघेल. यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.