शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस येथे सर्वधर्म परिषदेला प्रारंभ

By admin | Updated: February 7, 2015 23:20 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे

घुग्घुस: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे आज शनिवारी थाटात उदघाटन करण्यात आले. पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्रात शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य स्मिता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे होते. यावेळी डाखरे महाराज, हळदे महाराज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गावंडे गुरुजी, घुग्घुसचे उपसरपंच निरीक्षण तांड्रा, गोपालकृष्ण आकेवार, घोपटे यांची उपस्थिती होती.तरुण पिढी बलशाली व्हावी, शैक्षणिक दर्जा, सार्वजनिक, धार्मिक व बौद्धिक विकास व्हावा, आजचे विद्यार्थी उद्याचे उत्कृष्ट नागरिक तयार करण्यात ग्रामगीतेतील सेवा सामर्थ हा महत्वाचा अध्याय आहे, असे मत जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ते विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व सेवाभवी बनावे, असे विचार प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केले व श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी हळदे महाराज, डाखरे महाराज, गोपालकृष्ण आकेवार यांनी विचार व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांकरिता दोन गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गट ८ ते १० या विद्यार्थ्यांकरिता ग्रामगीता अध्याय ९ सेवा सामर्थ्य तर ११ ते पदवीधर विद्यार्थ्याकरिता ग्रामगीता अध्याय ३६ जीवनकला या विषयावरील स्पर्धेत हर्षा जेऊरकर प्रथम, कोमल नवले द्वितीय, प्राची तृतीय तर पदवीधर गटात जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुपाली बोढे प्रथम, भद्रावतीच्या विवेकानंद महाविद्यालयाच्या उज्वला नागपुरे द्वितीय व प्रशासकीय महाविद्यालय मोरवाच्या कोयल नवले या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतला. संचालन घोटेकर तर आभार शिरपूरकर यांनी मानले. (वार्ताहर)