पीक विमा : घामाचा पैसा विमा कंपन्यांच्या घशातलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे सततची नापिकी व त्यातच कर्जफेडीचे ओझे या विवंचनेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मरण येत नाही म्हणून तो कसाबसा जीवन जगत आहे. या आर्थिक संकटाचा सामना करीत असताना त्याला अस्मानी व सुलतानी संकटसुद्धा पेलावे लागत आहे. हातात आलेले पीक हिरावल्या जात आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या कळा बळीराजाला सहन कराव्या लागत आहे. याही बिकट परिस्थितीत शेतकरी हा पीक विम्याचा हप्ता भरत आहे. यातून जमीनदोस्त झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा आहे. पण, या विम्यासाठी पात्र असतानाही त्यांची पुरती बोळवण केली जात आहे. विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने त्यांच्यात कमालीचा आक्रोश पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा घामाचा पैसा विमा कंपनीच्या घशात गेल्याने ते मालामाल झाले आहे. या व्यवस्थेला प्रशासनातील अनास्था जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कृषी कर्मचारी व तलाठी हे कार्यालयात बसून पिकाची आकडेमोड करून नोंद करीत असल्याने शेतकरी हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली. या विम्यातून पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा होती. पण, ५० पेक्षा जास्त कशी गेली हा एक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. करोडो रुपयाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कवडीसुद्धा मिळाली नाही. मागील २ ते ३ वर्षांपासून शेतकऱ्यांवर ओला व कोरडा दुष्काळाची गडद छाया पडली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसाने हातच्या पिकावर संक्रांत येत आहे. सततच्या नापिकीने तो पुरता बेजार झाला आहे. त्यातच कर्जाच्या ओझ्यामुळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. तरीही शेतकऱ्याला चिमटा लावून पीकविमा उतरवित आहे. पण, या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. घामाचा पैसा विमा हप्त्यात देऊनदेखील शेतकरी पात्र ठरत असतानाही त्याला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अन्यायामुळे शेतकरी पुरता हवालदिल व मेटाकुटीस आला आहे. राजुरा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळाला नाही, हे विशेष.दोन कोटीवर रक्कमराजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली.
शेतकऱ्यांची अशीही बोळवण
By admin | Updated: May 25, 2017 00:32 IST