शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अध्यापक सारस्वताचा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय लांडगे म्हणाले, मराठी शिक्षकांनी पराभूत मानसिकता न जोपासता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

ठळक मुद्देवसंत पुरके : राज्यस्तरीय मराठी शिक्षक कृतिसत्राचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शैक्षणिक वातावरण, परिणामकारक अध्यापन कौशल्य, सर्जनशिल, सृजनात्मक आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर दर्जेदार मराठी शिक्षण व भाषेची भरभराट कुणीही थांबवू शकत नसल्याचे प्रतिपादन माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले.राजुरा येथील दोन दिवशीय ३९ व्या राज्यस्तरीय मराठी शिक्षकांच्या कृतिसत्राच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे होते. माजी आमदार सुदर्शन निमकर, बा.ग.यादव, विरा राठोड, भरत गावडे, दीपक दोंदल, ज्ञानेश्वर शिरभैये, राजु डाहुले, मीरा जोशी, रजनी शर्मा, केवाराम डांगे, सुभाष शेंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.वसंत पुरके आपले विचार व्यक्त करताना मातृभाषेकडे आपली पावले नकळत वळत असली तरी भाषा संकराशिवाय कुठलीही भाषा समृध्द होत नसल्याचा मुद्दा मांडला.मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय लांडगे म्हणाले, मराठी शिक्षकांनी पराभूत मानसिकता न जोपासता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचे मत मांडले. या कार्यक्रमात अल्का सदावर्त व स्वरप्रिती अकादमीच्या कलाकारांनी सुंदर स्वागतगित व मराठीगीत सादर केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र