सावली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत खेडी गावाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यामध्ये * *खेडी ग्रामपंचायतला १० लाखांचा पुरस्कार निधी मिळणार* आहे. *खेडी हे गाव नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन निर्मल ग्राम पुरस्कार, दोनदा स्वछ ग्राम पुरस्कार, सावित्रीबाई फुले अंगणवाडी जिल्हा पुरस्कार, सानेगुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे.
या योजनेत सावली तालुक्यात खेडी ग्रामपंचायतने प्रथम स्थान मिळविला असून तालुका पुरस्काराची रक्कम १०लाख रुपये मिळणार आहे. पुरस्कार मिळाल्याने गावकरी समाधान व्यक्त करीत आहेत.