शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खिन्न पुतळे अन् सुस्त यंत्रणा

By admin | Updated: January 17, 2016 00:55 IST

देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेविरुध्द ज्यांनी लढा दिला, ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य झिजविले,...

चंद्रपूर : देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेविरुध्द ज्यांनी लढा दिला, ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य झिजविले, त्यांचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत रहावे, यासाठी या महापुरुषांचे पुतळे शहरात उभारण्यात येतात. चंद्रपुरातही अनेक ठिकाणी थोरुपुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांमुळे त्यांच्या कार्याचे नागरिकांना तर स्मरण होत आहे. मात्र मनपा प्रशासनाला मात्र पुतळ्यांच्या स्वच्छतेचा व देखभालीचाच विसर पडल्याचे पुतळ्यांच्या दुर्दशेवरून दिसत आहे.येथील जटपुरा गेटवरील वसंत भवनासमोर असलेला स्व. मा.सा. कन्नमवार यांचा पुतळा त्यांच्या जन्मदिनीही स्वच्छ करण्याचे सौजन्य महापालिकेने दाखविले नाही. यामुळे अनेक नागरिकांनी लोकमतजवळ खंत व्यक्त केली. स्व. कन्नमवार यांच्या जयंतीदिनी बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक अभिवादनासाठी गेले असता पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून आला. नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला महानगर पालिकेकडून पाण्याचे टँकर लावून पुतळे स्वच्छ केले जातात. तेवढीही औपचारिकता मनपाने पार पाडली नव्हती. अखेर अभिवादनासाठी आलेल्या काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नळावरून पाणी घेवून पुतळा धुतला आणि परिसरातील घाण स्वच्छ केली. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करून, नव्हेतर सतत तीन दिवस याविषयी वृत्तमालिकाच प्रकाशित करून मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि स्व. मा.सा. कन्नमवार यांचा पुतळा परिसर स्वच्छ झाला. मात्र इतर पुतळ्यांचे काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने आज शनिवारी शहरात फेरफटका मारला असता अनेक पुतळे आपल्या दुर्दशेवर रडत असल्याचे दिसून आले. येथील भिवापूर मार्गावरील हनुमान खिडकीजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारल्यानंतर त्याच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत या पुतळ्याची दुर्दशा कायम होती. त्यानंतर समाजबांधवांनी ११ एप्रिल २०१५ रोजी या परिसराची स्वच्छता केली. पुतळ्याची रंगरगोटी केली होती. काही दिवस पुतळा चांगल्या स्थितीत दिसून आला. आता पुन्हा या ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. आझाद बगिचाला लागून विश्वेश्वराव महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचीही अनेक वर्ष दुर्दशा कायम राहिली. आजही या पुतळा नियमित स्वच्छ केला जात नाही. विशेष म्हणजे, या पुतळ्याच्या मागेच महानगरपालिकेने कचराकुंडी ठेवली आहे. मुतारी म्हणूनही या जागेचा वापर होतो. त्यामुळे पुतळ्याच्या मागे नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरले असते.रामनगर मार्गावरील संत कंवलराम चौकातील संत कंवलराम यांच्या पुतळ्याचीही नियमित स्वच्छता होत नाही. या परिसरातही काहीवेळा घाण दिसून येते. बाबुपेठ प्रभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचीही नीट देखभाल होत नसल्याचे दिसून आले. या पुतळ्याचीही नियमित स्वच्छता होत नसल्याचे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी अनेक पुतळे शहरात आहेत, त्यातील काही पुतळ्यांची दुर्दशा आजही कायम आहे. (शहर प्रतिनिधी)