विरूर स्टेशन : सिंधी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्याकडे राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी-विरुर स्टे. नाल्यावर पूल बांधकाम करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. आमदार धोटे यांनी संबंधित विभागाकडे याबाबतीत पाठपुरावा केला. या पुलाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देण्याकरिता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नागपूर विभागीय चमूने प्रत्यक्षात पाहणी केली. पुलाच्या उंचीबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाही विचारणा करण्यात आली. अन्य आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. लवकरच तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता या चमूने व्यक्त केली आहे. चंद्रपुरात स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत दि. १८ ऑगस्टला बैठक घेणार असल्याचेही नागपूरच्या कार्यकारी अभियंता अभियंता अंसारी यांनी सांगितले. याप्रसंगी चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता वरलानी, उपअभियंता जिवतोडे, कनिष्ठ अभियंता वडके, सिंधीचे उपसरपंच रामभाऊ ढुमणे, मंगेश रायपल्ले, राजू दामेरवार, विनोद ढुमणे, रज्जत डाहुले यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधी-विरूर स्टेशन नाल्यावरील पुलाच्या मान्यतेसाठी जागेची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST